गेली अनेक वर्षं 'मॅगी' आपल्या सैपाकघरात ठाण मांडून बसली आहे. आज माझा नूडल्स खायचा मूड आहे असं म्हणावं आणि गृहिणीच्या चेहेर्याकडे बघावं. 'सुटले गं बाई आज रोजच्या कटकटीतून' असा भाव घरातल्या बाईच्या चेहेर्यावर दिसतो.
पण आता दुसरा सीन बघा.
घरी बरेच पै-पाहुणे गप्पा हाणत बसलेत आणि 'मॅगी' खाणार का? हा प्रस्ताव मतदानाला टाकला तर एखादा तरी पाहुणा -
मॅगी नको 'टॉप रॅमेन' आहे का ? असं विचारतोच.
त्याच्याकडे बाकीचे सगळे हा आपल्या भावकीतला नाही असंच बघतात.












