फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या चहाच्या किंमतीची नेहमी चर्चा होत असते. पण जर तुम्हाला असे सांगितले की एका टपरीवर हजार रुपयांचा चहा मिळतो? डोळे विस्फारले ना वाचून? ही गोष्ट ना खोटी आहे, ना यात काही अतिशयोक्ती आहे.
ही गोष्ट आहे पश्चिम बंगालची!! बंगालमधल्या पार्थप्रतिम गांगुली यांनी आपली चांगली नोकरी सोडली आणि त्यांनी चहा विकायचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या चहाच्या दुकानात एक दोन नाही,तर ११५ प्रकारचे चहा मिळतात. जपानच्या सिल्व्हर निडल व्हाइट टी पासून आफ्रिकी कॅरमल, नायजेरियन रेड वाईन चहा, ऑस्ट्रेलियन लँवेंडरपर्यन्त सर्व प्रकारचा चहा इथे मिळतो.






