एनएसजी - नॅशनल सिक्युरीटी गार्ड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला ! त्या अतिरेकी हल्ल्याचा सामना सुरुवातीला केवळ एकटे मुंबई पोलीस करत होते पण हा हल्ला सर्वसामान्य कायदा आणि सुव्यवस्थेच्या पलीकडचा होता. आपल्या महाराष्ट्र पोलीसांच्या धैर्यात कमी नव्हती - विश्वास नांगरे पाटील -देवेन भारती यांच्या सारखे अधिकारी उपलब्ध असलेल्या शस्त्रांनी हल्ल्याला प्रत्युत्तर देत होते पण त्यांच्या हातात असलेल्या शस्त्रांना मर्यादा होत्या. समोर दुश्मनांच्या हातात अत्याधुनीक शस्त्रास्त्रे होती. अशावेळी गरज होती अत्यंत आधुनीक शस्त्रांनी सज्ज असलेल्या आणि अतिरेकी हल्ल्याचा सामना करण्याचा अनुभव असलेल्या लढाऊ दलाची ! म्हणजेच “ब्लॅक कॅट कमांडोज”ची !! एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो आले आणि जवळ जवळ साठ तासाच्या लढाईनंतर जेव्हा ताजमध्ये शेवटचे चार अतिरेकी संपले तेव्हा हा अतिरेकी हल्ला संपुष्टात आला.
आज शनिवार स्पेशल मध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्लॅक कॅट कमांडो वापरात असलेल्या शस्त्रांबद्दल !!













