आपल्याकडे पूर्वी फक्त सिनेमे ‘लार्जर दॅन लाईफ’ असायचे, पण हल्ली लग्नं पण ‘लार्जर दॅन लाईफ’ असतात. प्री-वेडिंग शूट, मोठे मंडप, सजावट, याखेरीज जयपूर, उदयपूरसारख्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडींग, लग्नात स्टार मंडळींचे डान्स, एक ना दोन.. श्रीमंत लोकांमध्ये अशा प्रकारच्या लग्नाचा नवीन ट्रेंड आला आहे. नुकतंच उत्तराखंडच्या औली येथे असंच एक लग्न पार पडलं आणि मागे राहिला तब्बल ४०० किलो कचरा
२०० कोटीचं लग्न आणि तब्बल ४००० किलो कचरा....कोणाचं लग्न होतं हे ??


मंडळी, लग्न होतं तब्बल २०० कोटी रुपयांचं. उत्तराखंडच्या औली येथील निसर्गरम्य ठिकाणी हे लग्न पार पडलं. साऊथ आफ्रिकेत राहणारे कोट्याधीश अतुल गुप्त यांच्या दोन मुलांचं हे लग्न होतं.

दोन भव्य मंडप, स्वित्झर्लंडवरून मागवलेले फुलांचे ताटवे, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वराती असा सगळा लग्नाचा थाट होता. लग्न पार पडल्यावर उत्तराखंड महानगरपालिकेसमोर मात्र याहून मोठा प्रश्न उभा राहिला होता. लग्नामुळे तब्बल ४००० किलो कचरा तयार झाला होता.

औली भागात फारसे पर्यटक नसतात आणि तिथली लोकसंख्या कमी आहे. त्यामळे स्वच्छता राखण्यासाठी साधारणपणे ४ लोक लागतात. पण या लग्नामुळे जवळजवळ २० लोकांची फौज कामाला लावण्यात आली होती. इतक्या माणसांकडूनही हा कचरा आवरला गेला नाहीय. याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उत्तराखंड कोर्टाने प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी आणली.

मंडळी, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर गुप्ता परिवाराने भरपाई म्हणून ५४,००० रुपये दिले आहेत. तरी शेवटी प्रश्न उरतोच, ‘लार्जर दॅन लाईफ’ लग्न करण्याची खरंच गरज असते का ?
मंडळी, तुम्हाला काय वाटतं या घटनेविषयी. केमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा !!
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१