आयसीआयसीआय बँकेची अंडीपिल्ली बाहेर काढणारे अरविंद गुप्ता कोण आहेत ?

लिस्टिकल
आयसीआयसीआय बँकेची अंडीपिल्ली बाहेर काढणारे अरविंद गुप्ता कोण आहेत ?

गेले काही महिने ICICI बॅक आणि बँकेच्या मॅनेजींग डायरेक्टर चंदा कोचर यांच्याबद्दल  मिडीयामध्ये चर्चा चालू आहे. हजारो कोटीचे कर्ज बुडीत ठेवणार्‍या व्हिडीओकॉन कंपनीच्या सोबत अर्थपूर्ण संबंध ठेवून स्वतःची झोळी भरून घेतल्याचा आरोप चंदाताईंवर आहे. आता या प्रकरणाची चौकशी एका आयोगातर्फे चालू आहे. त्या आयोगाचे निष्कर्ष आपल्याला सवडीने कळतीलच.  पण मुळात हे प्रकरण खणून बाहेर काढणार्‍या "अरविंद गुप्ता",  ज्यांचा उल्लेख वारंवार व्हिसल ब्लोअर म्हणून केला जातो त्यांची ओळख आम्ही आज तुम्हाला करुन देत आहोत.

पण आधी बघू या व्हिसल ब्लोअर म्हणजे काय ?

पण आधी बघू या व्हिसल ब्लोअर म्हणजे काय ?

व्हिसल ब्लोअर महणजे मराठीत "जागल्या ". गाढ झोपेत असलेल्या व्यवस्थेला ढुशी मारून जागे करणारा तो "जागल्या " अशा जागल्यांमुळेच जगातले अनेक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले गेले आहेत. व्हिसल ब्लोअरची पुढची पायरी असते "अ‍ॅक्टीव इन्वेस्टर"ची. पण ते आपण नंतर कधी तरी बघू या !!

कोण आहेत अरविंद गुप्ता ?

कोण आहेत अरविंद गुप्ता ?

अरविंद गुप्ता हे आयसीआय सीआय आणि व्हिडीओकॉन या दोन्ही कंपन्यांचे भागधारक आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बँकेचे अधिकारी - कर्ज घेणार्‍या कंपन्या आणि गलथान सरकार हे सर्व मिळून बँकींग क्षेत्राच्या घोटाळ्याला जबाबदार आहेत.

सरकार जबाबदार आहे असे ते का म्हणतात ?

सरकार जबाबदार आहे असे ते का म्हणतात ?

या घोटाळ्याबद्दल अरविंद गुप्ता यांनी २०१६ साली म्हणजे, जवळजवळ दोन वर्षांपूर्वीच आवाज उठवला होता. त्यांनी पंतप्रधान आणि  रिझर्व बँक यांना अनेक वेळा पत्रे लिहून या घोटाळ्याकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. पण त्यांच्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली नाही

मग आताच कशी दखल घेतली गेली ?

जेव्हा हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेणार्‍या व्हिडीओकॉन कंपनीने काखाबगला वर केल्या तेव्हा हे बिंग फुटले. 

या घोटाळ्यात चंदा कोचर यांनी हात मिळवणी केली आहे असा आरोप का केला गेला ?

या घोटाळ्यात चंदा कोचर यांनी हात मिळवणी केली आहे असा आरोप का केला गेला ?

नियमाबाहेर जाऊन व्हीडीओकॉन कंपनीला कर्ज देणे आणि कर्ज दिल्यावर तेच पैसे त्यांच्या (चंदा कोचर यांच्या) पतीच्या कंपनीत गुंतवले असा आरोप कोचर यांच्यावर आहे

अरविंद गुप्ता यांना हे सर्व कळले कसे ?

अरविंद गुप्ता यांच्या म्हणण्याप्रमाणे हा घोटाळा बँकेच्या आणि व्हिडीओकॉनच्या बॅलन्सशीट मध्ये  दिसत होता. पण तो नीट समजून, त्यानुसार अधिक कागदपत्रे मागवून त्यांनी या घोटाळ्याची शहानिशा केली आहे. जे कागदपत्र त्यांनी अभ्यासासाठी वापरले ते सर्व पब्लीक डॉक्युमेंट्स " या सदरात मोडतात आणि विनंती केल्यावर सहज मिळू शकतात. हे सर्व कोणताही सामान्य गुंतवणूकदार त्याचे हक्क वापरुन करु शकतो.

आता पुढे काय ?

आता पुढे काय ?

अरविंद गुप्ता म्हणतात की एक व्यक्ती म्हणून त्यांच्या शोधकार्याला मर्यादा आहेत. या पुढचा शोध  सरकारी संस्थांनी घ्यायचा आहे. सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणेने धूत यांची व्हिडीओकॉन, चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर यांची कंपनी  नू पॉवर, - आणि नियमबाह्य कर्ज देणार्‍या आयसीआयसीआयच्या मॅनेजींग डायरेक्टर यांच्या सर्व व्यवहाराची फेर तपासणी करायला हवी. त्रयस्थ माध्यमातून त्यांचे "फोरेन्सीक ऑडीट" करण्याची गरज आहे.

सामान्य माणसाच्या जीवनाशी याचा काय संबंध असू शकतो ?

सामान्य माणसाच्या जीवनाशी याचा काय संबंध असू शकतो ?

या घोटाळ्यातून सिध्द होते की, जर तुमची बँकेच्या उच्चपदस्थांसोबत मैत्री असली तर कर्ज सहज मिळते. पण तुम्ही सामान्य माणूस असाल तर बँकांकडून कर्ज मिळवणे फारच कठीण आहे. 

पुढे काय ? 

कालच आलेल्या बातमीनुसार खडबडून जागे झालेल्या सरकारने आता बँकेच्या अशाच तब्बल १००० बुडीत कर्जांचे शोध कार्य आता सुरु केले आहे.

हे सर्व सत्य बहेर आणल्याबद्दल आपण अरविंद गुप्ता यांचे आभार मानलेच पाहिजेत.  पण येत्या काळात असे अनेक व्हिसल ब्लोअर पुढे आले तर गुंतवणूकदारांना न्याय मिळेल.

टॅग्स:

bobhata marathimarathi infotainmentmarathi news

संबंधित लेख