एक संशोधनानुसार भारतात कुत्रा हा ८० टक्के घरगुती पाळीव प्राणी म्हणून पाळला जातो. दरवर्षी साधारणतः ६००००० पाळीव प्राणी दत्तक घेतली जातात. याचे कारणही रोचक आहे. कुत्रा हा मालकासाठी जगत असतो तर मांजर त्या घरासाठी. कुत्रा हा मालक जाईल तिकडे जातो, पण मांजर आपल्या मनाप्रमाणे वागणं पसंत करते. म्हणूनच कुत्रा हा पहिली पसंत असतो.
कुत्र्याच्या अनेक सवयी आपल्याला ओळखीच्या आहेत. जसे की शेपूट हलवणे, मान तिरकी करून बघणे, धावत्या कारच्या मागे धावणे, इत्यादी. अशीच एक सवय म्हणजे, झोपण्यापूर्वी गोल फिरणे. कुत्रा झोपताना नेहमी त्या जागेभोवती गोल फिरतो आणि मगच झोपतो. अगदी घरात जरी असेल तरीही तो नेहमीच्या जागेभोवती चक्कर मारतो आणि मगच झोपतो.
आजचा आपला लेख कुत्र्याच्या याच सवयीशी निगडित आहे. कुत्रा गोल फिरण्यामागे नेमकं काय कारण आहे हे सविस्तर समजून घेऊया.







