या ३ कारणांमुळे होतोय मुंबई इंडियन्स संघाचा पराभव, नक्की वाचा

या ३ कारणांमुळे होतोय मुंबई इंडियन्स संघाचा पराभव, नक्की वाचा

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाचा जेव्हा उल्लेख होतो, त्यावेळी मुंबई इंडियन्स हे नाव सर्वात पुढे असतं. दुनिया हिला देंगेचा नारा देत हा संघ मैदानात उतरतो आणि भल्या भल्या संघांना पाजी पाजतो, अशी या संघाची ओळख आहे. परंतु आयपीएल २०२२ स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर, या संघाला साजेशी कामगिरी करता आली नाहीये. एक, दोन किंवा तीन नव्हे तर सलग सात सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत कुठल्याही संघाने स्पर्धेतील सलग ७ सामने गमावले नव्हते. मुंबई इंडियन्स असा पराक्रम करणारा पहिलाच संघ आहे. मुंबई इंडियन्सची नेमकी चूक होतेय तरी कुठं? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर पाहूया काय आहेत मुंबईच्या पराभवाची मुख्य करणे.

१) सलामी जोडी ठरतेय फ्लॉप

आयपीएल २०२२ स्पर्धेचा लिलाव झाला त्यावेळी वाटले होते की, मुंबई इंडियन्स संघाची सलामी जोडी ही या स्पर्धेतील सर्वात विस्फोटक सलामी जोडी पैकी एक असणार आहे. कारण मुंबई इंडियन्स संघाने ईशान किशनला १५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. एकीकडे हिटमॅन रोहित शर्मा, तर दुसरीकडे पॉकेट डायनॅमो ईशान किशन. दोघेही आक्रमक शैलीने फलंदाजी करतात. परंतु दोघांनीही मुंबईच्या चाहत्यांना निराश केले आहे.

 ईशान किशनच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ७ सामन्यात ३१.८३ च्या सरासरीने १९१ धावा केल्या आहेत. ज्यात नाबाद ८१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तर रोहित शर्माने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात १६.२९ च्या सरासरीने केवळ ११४ धावा केल्या आहेत. हे दोघेही फलंदाज मुंबई इंडियन्स संघाला चांगली सुरुवात करून देण्यास अपयशी ठरत आहेत. परिणामी मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहे.

२) असंतुलित गोलंदाजी क्रम :

मुंबई इंडियन्स संघाकडे अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. जो कुठल्याही फलंदाजाला कुठल्याही क्षणी अडचणीत टाकू शकतो. परंतु संघातील इतर गोलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे त्याच्यावरील दबाव वाढत आहे. कुठलाही गोलंदाज टी२० सामन्यात जास्तीत जास्त ४ षटक गोलंदाजी करू शकतो. तो आपल्या ४ षटकात मोजक्याच धावा खर्च करत आहे. परंतु संघातील इतर गोलंदाजांच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी होत आहे. परिणामी मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. डॅनियल सॅम्स आणि जयदेव उनाडकट या गोलंदाजांना देखील साजेशी कामगिरी करता आली नाहीये.

३) सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंची कमतरता :

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ७ पैकी ७ सामने गमावले आहेत. या सातही सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा तोंडचा घास काढून घेण्यात आला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, ट्रेंट बोल्ट आणि लसिथ मलिंगा सारखे खेळाडू होते. जे कुठल्याही परिस्थितीत सामना मुंबई इंडियन्स संघाला जिंकून देत होते. लसिथ मलिंगा राजस्थान रॉयल्स संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. तर हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स, कृणाल पंड्या लखनऊ सूपर जायंट्स आणि ट्रेंट बोल्ट राजस्थान रॉयल्स संघासाठी मोलाची भूमिका पार पाडत आहे. हे खेळाडू संघाबाहेर झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाला असा एकही खेळाडू गवसला नाहीये जो, कुठल्याही स्थितीत येऊन मुंबई इंडियन्स संघाला सामना जिंकून देईल.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख