आयपीएल (Ipl) २०२२ स्पर्धेतील ६ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने जोरदार विजय मिळवला. यासह फाफ डू प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार म्हणून पहिला वाहिला विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २०० पेक्षा अधिक धावा करूनही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराने घेतलेल्या या निर्णयाला योग्य ठरवत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली. ज्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १८.५ षटकात १२८ धावांवर संपुष्टात आला.
कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फलंदाजी करताना, आंद्रे रसलने सर्वाधिक २५ धावा केल्या. तर उमेश यादवने १८, सॅम बिलिंग्जने १४ आणि कर्णधार श्रेयस अय्यरने १३ धावांचे योगदान दिले होते. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना वनिंदू हसरंगाने ४ बळी घेतले, तर आकाशदीपने ३ बळी घेतले. तसेच हर्षल पटेलने २ तर मोहम्मद सिराजला १ गडी बाद करण्यात यश आले.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिलेल्या १२९ धावांचा पाठलाग करताना, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सुरुवातीलाच ३ मोठे धक्के बसले. त्यानंतर डेविड विली आणि रूदरफोर्डने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील एका पाठोपाठ एक गडी बाद होत होते ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ अडचणीत आला होता. परंतु शेवटी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १९.२ षटकात ७ गडी गमावून विजयाची नोंद केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून रूदरफोर्डने सर्वाधिक २८ तर शहबाझ अहमदने २७ धावा केल्या.




