आज होणाऱ्या सामन्यात हे खेळाडू करून देऊ शकतात लाखोंची कमाई! पाहा बोभाटाची ड्रीम ११ टीम

आज होणाऱ्या सामन्यात हे खेळाडू करून देऊ शकतात लाखोंची कमाई! पाहा बोभाटाची ड्रीम ११ टीम

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premiere League) २०२२ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. कारण लखनऊ सुपर जायंट्स संघाने याच हंगामात पदार्पण केले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.तर लखनऊ सुपर जायंट्स संघाला गुजरात टायटन्स संघाने ५ गडी राखून पराभूत केले होते.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

लखनऊ सुपर जायंट्स:

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, एविन लुईस,मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, आयुष बदोनी, आवेश खान, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमीरा, अंकित राजपूत

चेन्नई सुपर किंग्ज

रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी, डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, मोईन अली, ड्वेन ब्रावो, ॲडम मिल्ने, तुषार देशपांडे

अशी असू शकते ड्रीम ११ टीम :

केएल राहुल, क्विंटन डी कॉक, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, दीपक हुडा, मोईन अली, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान

कर्णधार : क्विंटन डी कॉक

उपकर्णधार : रवींद्र जडेजा

टॅग्स:

IPL

संबंधित लेख