केकेआरचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

केकेआरचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

आयपीएल २०२२ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झालं आहे. या स्पर्धेतील ८ वा सामना मयांक अगरवालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोलकाता नाईट रायडर्स संघाला गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु त्यांचा आत्मविश्वास उचांवलेला असेल कारण १२९ धावांचा बचाव करताना त्यांनी विरोधी संघांचा घाम काढला होता. तर पहिल्याच सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत केले होते. 

तर पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार मयांक अगरवाल देखील चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने २०५ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. 

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

कोलकाता नाईट रायडर्स :

श्रेयस अय्यर (कर्णधार), टीम साऊदी, सॅम बिलिंग्ज, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, उमेश यादव

पंजाब किंग्ज :

मयांक अगरवाल ( कर्णधार) , शिखर धवन, लियाम लिविंगस्टन, भानुका राजपक्षा, ओडीयन स्मिथ, शाहरुख खान, राज बावा, हरप्रीत बर, कागीसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चाहर

टॅग्स:

IPL

संबंधित लेख