आयपीएल २०२२ स्पर्धेत लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow super giants) संघाचा कर्णधार केएल राहुलला (Kl rahul) चांगली सुरुवात करण्यात अपयश आले आहे. गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (mohammad shami) याने पहिल्याच चेंडूवर त्याला बाद करत लखनऊ सुपरजायंट्स संघाला मोठा धक्का दिला आहे. केएल राहुल गोल्डन डक वर बाद होऊन माघारी परतला. यापूर्वी २०१६ मध्ये गुजरात लायन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील तो गोल्डन डकवर माघारी परतला होता.
मोहम्मद शमीने केएल राहुलला बाद करण्यासाठी अप्रतिम चेंडू टाकला होता. त्याचा हा चेंडू टप्पा पडताच बाहेरच्या दिशेने निघाला ज्यामुळे केएल राहुल अडचणीत सापडला आणि चेंडू बॅटचा कडा घेत,यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हातात गेला.
How good was that first over from @MdShami11. Gets the big wicket of KL Rahul.
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
Live - https://t.co/4Kt4dkerZU #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/IDcZ4VIpgG
मोहम्मद शमीने हा चेंडू टाकल्यानंतर पंचांकडे जोरदार मागणी केली होती. परंतु पंचांनी ती मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर मोहम्मद शमीने हार्दिक पंड्याला डीआरएस घेण्यास सांगितले आणि डीआरएसमध्ये स्पष्टपणे दिसून येत होते की, चेंडू बॅटचा कडा घेऊन यष्टिरक्षकाकडे गेला आहे. केएल राहुल बाद होताच पहिल्यांदाच नेतृत्व करत असलेला हार्दिक पंड्या भलताच खुश झाला होता.




