हॅट्ट्रीक घेणाऱ्या चहलवर कौतुकाचा वर्षाव! दिग्गजाने गायले गुणगान

हॅट्ट्रीक घेणाऱ्या चहलवर कौतुकाचा वर्षाव! दिग्गजाने गायले गुणगान

आयपीएल २०२२(Ipl 2022) स्पर्धेतील ३० वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals)  आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata knight riders)  या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra chahal) अप्रतिम गोलंदाजी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवून दिला. यासह आयपीएल २०२२ स्पर्धेतील पाहिली हॅट्ट्रिक देखील घेतली. या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाने (Lasith malinga)  त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाने म्हटले की, युजवेंद्र चहलने दाखवून दिले आहे की, आयपीएल स्पर्धेत फिरकी गोलंदाजांना सामना जिंकून देणारे गोलंदाज का म्हणतात. तो म्हणाला की, "चहलकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. तो या स्पर्धेतील आणि भारतीय संघाचा एक अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. चहलने या सामन्यात दाखवून दिले की, नियंत्रित गोलंदाजी कशाप्रकारे केली जाते. त्याने सिद्ध केले की, तो कुठल्याही स्तरावर गोलंदाजी करण्यासाठी सक्षम आहे." 

तसेच सामना झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्यूलमने देखील युजवेंद्र चहलचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले की, "तुम्ही चहल सारख्या गोलंदाजाला दबाव बनवण्याची संधी देऊ शकत नाही. आम्ही खूप चांगला खेळ केला. परंतु काही ठिकाणी आम्ही चुका केल्या. ते होत राहतं. सलग ३ सामने गमावल्यानंतर आता आम्हाला पुन्हा एकदा ट्रॅक वर यावं लागेल." 

युजवेंद्र चहलने कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द झालेल्या सामन्यात ४ षटक गोलंदाजी केली. ज्यात त्याने ४० धावा खर्च करत ५ गडी बाद केले. त्याने १७ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यर, पाचव्या चेंडूवर शिवम मावी आणि सहाव्या चेंडूवर पॅट कमिन्सला बाद करत माघारी धाडले. यासह आपली हॅट्ट्रिक देखील पूर्ण केली.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख