मुंबईचा सलग दुसरा पराभव! राजस्थान रॉयल्स संघाने मिळवला २३ धावांनी विजय

मुंबईचा सलग दुसरा पराभव! राजस्थान रॉयल्स संघाने मिळवला २३ धावांनी विजय

आयपीएल (Ipl) २०२२ स्पर्धेतील ९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. नवी मुंबईतील डी वाय स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने २३ धावांनी जोरदार विजय मिळवला. मुंबई इंडियन्स संघाचा हा आयपीएल २०२२ स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाचा हा सलग दुसरा विजय आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाकडून जोस बटलरने तुफानी खेळी केली. त्याने ६८ चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि ५ षटकारांचा साहाय्याने शतकी खेळी केली. तर शिमरोन हेट मायरने ३५ आणि कर्णधार संजू सॅमसनने ३० धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर ८ बाद १९३ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून ईशान किशनने सलामीला येत ५४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. तर तिलक वर्माने ६१ धावांचे योगदान दिले. तर कायरन पोलार्डने शेवटी झुंज देत २२ धावांचे योगदान दिले. परंतु मुंबई इंडियन्स संघाला दिलेले आव्हान गाठता आले नाही. हा सामना राजस्थान रॉयल्स संघाने २३ धावांनी आपल्या नावावर केला.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख