नादियाचा भूतकाळ जाणून घेतला तर तिचे आजचे यश का महत्वाचे आहे याचा अंदाज येऊ शकतो. नादियाचा जन्म अफगाणिस्तानला झाला. तिचे वडील अफगाण आर्मीत जनरल होते. तालिबानकडून त्यांची हत्या करण्यात आली. अशा परिस्थितीत ती आपल्या कुटुंबासोबत डेन्मार्कला गेली. डेन्मार्कला गेल्यावर तिने हळूहळू आपले फुटबॉल खेळणे सुरू केले. आधी ती B52 अलबोर्ग आणि विबोर्ग संघासोबत खेळत होती. पुढे ती स्काय ब्ल्यू फुटबॉल क्लबकडून खेळायला लागली. यानंतर मोठ्या पीएसजी क्लबसोबत ती जोडली गेली.
२००९ येता-येता ती डेन्मार्ककडून खेळायला लागली होती. २०१८ ला तर ती मँचेस्टरकडून देखील खेळली. डेन्मार्ककडून ती आजवर ९८ सामने खेळली आहे. डेन्मार्ककडून १०० सामने खेळण्याची तिची इच्छा यंदा पूर्ण होईल.
वयाच्या १२ व्या वर्षी पूर्ण आयुष्य उध्वस्त झालेली एक मुलगी स्थलांतरित होऊन दुसऱ्या देशात जाते आणि तिथे जाऊन त्या देशातील फुटबॉलमधील प्रमुख खेळाडू होते हा प्रवास खचितच सोपा नाही.