सध्या मीम्सचा जमाना आहे. तुम्ही बनवलेला एखादा मीम तुम्हाला फेमस करून शकतो. तर एखाद्यावेळीय तुम्ही स्वतःच मीम बनून पण तुम्ही फेमस व्हाल. मात्र एखाद्या मीमची चक्क बोली लागावी इतके अच्छे दिन मीमचे आले नव्हते. आता ते पण आले आहेत.
सुरुवातीपासून सांगायचे झाल्यास पाकिस्तानातील असिफ रजा याने त्याचा दोस्त मुदासीरसोबतची मैत्री तोडून दुसरा सलमान नावाच्या दुसऱ्या मित्राला आपला बेस्ट फ्रेंड बनवले. यात तसे नविन काही नाही सगळीकडे असे होतच असते. पण पठ्ठ्याने तसा थेट फोटो एडिट केला आणि फेसबुकवर टाकला.






