आयपीएल २०२२( ipl 2022) स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झाले असून, आता प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. प्लेऑफमधील पहिला सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. तर ज्या संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. त्या संघातील खेळाडूंनी आपल्या घरी जायला सुरुवात केली आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स (Mumbai indians) संघाचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. (Rohit Sharma viral video)
आयपीएल स्पर्धेचे ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला यावेळी हवी तशी कामगिरी करता आली नाही. पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी राहिला. रोहित शर्मा या हंगामात फलंदाजीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. तसेच त्याच्या नेतृत्वाची जादू देखील यावेळी कामी आली नाही. परंतु घरी जाता जाता रोहित शर्माने मन जिंकणारे कृत्य केले आहे.
Rohit Sharma to the youngster Ramandeep Singh before leaving the IPL bubble - captain. pic.twitter.com/0Q4DTJOWDT
— Johns. (@CricCrazyJohns) May 24, 2022
रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात तो आपल्या संघातील खेळाडूंबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहे. तुम्ही पाहू शकता की, घरी परतत असताना रोहित शर्मा आपल्या खेळाडूंची भेट घेत आहे. तसेच युवा खेळाडू रमनदिप सिंग जेव्हा त्याची भेट घ्यायला येतो, त्यावेळी रोहित शर्मा त्याला म्हणतो की, "काळजी घे, काही वाटलं तर बिंदास फोन कर.." तसेच रोहित शर्माने युवा फलंदाज तिलक वर्माला भेट म्हणून आपली बॅट दिली.




