मोईन अलीची जागा भरून काढण्यासाठी 'हे' आहेत सीएसकेचे ३ प्रबळ दावेदार

मोईन अलीची जागा भरून काढण्यासाठी 'हे' आहेत सीएसकेचे ३ प्रबळ दावेदार

आयपीएल २०२२ स्पर्धेला २६ मार्च पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. या रोमांचक सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाला दुहेरी धक्का बसला आहे. दीपक चाहर नंतर आता संघातील मुख्य अष्टपैलू खेळाडू मोईन अली देखील पहिल्या सामन्यात खेळताना दिसून येणार नाहीये. मोईन अलीला अजूनही व्हिसा मिळाला नाहीये. त्यामूळे त्याला भारतात यायला उशीर होऊ शकतो.

तसेच जर तो बुधवारी (२३ मार्च) भारतात दाखल झाला असता,तर त्याला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली असती. कारण खेळाडूंनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ३ दिवस विलगिकरणात राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे मोईन अली पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. परंतु चेन्नई सुपर किंग्ज संघात एकापेक्षा एक धाकड खेळाडू आहेत, जे मोईन अलीची जागा भरून काढू शकतात. चला तर पाहूया कोण आहेत ते ३ खेळाडू ज्यांना मोईन अलीच्या जागी प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

१) रॉबिन उथप्पा :एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आतापर्यंत ३ परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरला आहे. असेच काहीसे चित्र आगामी हंगामात देखील पाहायला मिळू शकते. परंतु पहिल्या सामन्यात मोईन अली उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी रॉबिन उथप्पाला संधी दिली जाऊ शकते. गतवर्षी रॉबिन उथप्पाने मिळालेल्या संधीचे सोने करत चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.

२) एन जगदिशन : चेन्नई सुपर किंग्ज संघ २०१८ पासून एन जगदिशनला घडवत आहे. आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे. मोईन अली संघाबाहेर असताना एन जगदिशनला आपले कौशल्य दाखवण्याची संधी दिली जाऊ शकते. त्याने सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अप्रतिम फलंदाजी केली होती. त्याने तामिळनाडू संघासाठी सर्वाधिक २०४ धावा केल्या होत्या. 

) मिचेल सेंटनर :मिचेल सेंटनरलाही सीएसकेमध्ये आल्यापासून जास्त संधी मिळाली नाहीये. परंतु आगामी हंगामात त्याला संधी दिली जाऊ शकते. तो फिरकी गोलंदाजीसह फलंदाजी देखील करू शकतो. त्यामुळे मोईन अलीच्या ऐवजी मिचेल सेंटनरला संघात स्थान दिले जाऊ शकते.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख