शाळेत असताना सर्रास खेळला जाणारा खेळ म्हणजे रस्सीखेच. रस्सीखेच जिंकण्यासाठी ताकद लागते. मग खेळ असो की आयुष्य हे शिकवणारा हा खेळ तसा लोकप्रिय असला तरी खेळाच्या व्याख्येत बसत नाही. म्हणजे या खेळाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत नाहीत. मात्र एक वेळ अशी होती, जेव्हा हा खेळ चक्क ऑलिम्पिकमध्ये खेळला जात होता.
१९०० सालापासून रस्सीखेचचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होता. १९२० सालापर्यंत ऑलिम्पिकमध्ये रस्सीखेच खेळला जात असे. १९१६ सालचा अपवाद सोडला तर १९२० पर्यन्त सर्वच ऑलिम्पिक्समध्ये हा खेळ होता. पहिल्या दोन ऑलिम्पिकमध्ये ५ किंवा ६ खेळाडू मिळून संघ बनवत असत. १९०८ साली ही संख्या आठ झाली.
रस्सीखेच आपण शाळेत खेळायचो त्याच पद्धतीने खेळला जात असे. ८ लोकांच्या संघाने दुसऱ्या संघाला ६ फुटांपर्यंत ओढले तर तो जिंकला असा नियम होता. तेव्हाही विविध देशांचे विविध संघ यात सहभागी होत असत.





