'उस्मानाबाद एक्स्प्रेस' ते 'बेबी एबी' अंडर १९ संघातील या खेळाडूंच्या कामगिरीवर असतील सर्वांच्या नजरा

'उस्मानाबाद एक्स्प्रेस' ते 'बेबी एबी' अंडर १९ संघातील या खेळाडूंच्या कामगिरीवर असतील सर्वांच्या नजरा

आयपीएलचे १५ वे हंगाम सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत . आगामी हंगामासाठी सर्व संघांनी कसून तयारी सुरू केली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदा विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तसेच यावर्षी अंडर- १९ क्रिकेटमधील काही स्टार खेळाडू देखील या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत. चला तर पाहूया अंडर १९ संघातील असे खेळाडू ज्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. 

१) राज बावा :आयपीएल २०२२ स्पर्धेच्या लिलावापूर्वी अंडर-१९ वर्ल्डकपचा ​​अंतिम सामना झाला होता. या सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात राज बावाने अष्टपैलू कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्याने फलंदाजी करताना ३० धावा केल्या होत्या यासह गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले होते. या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा तो दुसरा गोलंदाज होता. त्याने या स्पर्धेत शतकही झळकावले होते. बावाने सहा सामन्यात ९ गडी बाद केले होते यासह ६३ च्या सरासरीने २५२ धावा देखील केल्या होत्या. आगामी हंगामात तो पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. पंजाब किंग्ज संघाने त्याला २ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे.

) राजवर्धन हंगरगेकर : भारतीय अंडर १९ संघाला विजय मिळवून देण्यात राजवर्धन हंगरगेकरने देखील मोलाची भूमिका बजावली. त्याने या स्पर्धेत केवळ ५ गडी बाद केले होते. परंतु त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. त्याने वेगवान उसळी घेणारे आणि स्विंग होणारे चेंडू टाकून फलंदाजांना अडचणीत टाकले होते. यासह त्याने फलंदाजीमध्ये देखील मोलाचे योगदान दिले. त्याची अष्टपैलू कामगिरी पाहता त्याला चेन्नई सुपर किंग्जने १.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे.

) यश धूल : भारतीय अंडर १९ संघाचा कर्णधार यश धूल हा भारतीय संघाच्या विजयाचा खरा नायक होता. कोरोनामुळे त्याला काही सामन्यातून बाहेर राहावे लागले होते. परंतु जेव्हा त्याने पुनरागमन केले. त्यावेळी त्याने शतक देखील झळकावले. त्याने या स्पर्धेत ७६.३३ च्या सरासरीने एकूण २२९ धावा केल्या. त्याची ही कामगिरी पाहता आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला ५० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. आयपीएल लिलावात बोली लागल्यानंतर त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावले.

४) डेवाल्ड ब्रेविस : दक्षिण आफ्रिकेचा युवा अष्टपैलू खेळाडू डेवाल्ड ब्रेविस हा अंडर १९ क्रिकेटमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. ५ वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने त्याला ३ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. त्याने अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत ८४.३३ च्या सरासरीने ५०६ धावा केल्या होत्या. त्याची फलंदाजी शैली ही मिस्टर ३६० एबी डीविलियर्स सारखी आहे. त्यामुळे त्याला 'बेबी एबी' असे देखील म्हटले जाते.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख