दिनेश कार्तिक भारतासाठी टी२० विश्वचषक खेळणार का? वाचा काय म्हणाला किंग कोहली

दिनेश कार्तिक भारतासाठी टी२० विश्वचषक खेळणार का? वाचा काय म्हणाला किंग कोहली

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धा सुरू होण्यापूर्वी असे म्हटले जात होते की, भारतीय यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik)  कारकीर्द संपुष्टात येऊ लागली आहे. परंतु त्यानंतर आयपीएल २०२२ स्पर्धेचा लिलाव सोहळा पार पडला आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाने(kolkata knight riders) रिलीज केलेला खेळाडू दिनेश कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal challengers Bangalore)  संघाने आपल्या संघात स्थान दिले. या संघात स्थान मिळूनही अनेकांचे म्हणणे असे होते की, हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचे हंगाम असू शकते. परंतु त्याने टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत, अप्रतिम खेळ्या केल्या आहेत. 

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजय मिळवून देण्यात तो मोलाचे योगदान देत आहे. या स्पर्धेतील तो एकमेव फलंदाज आहे जो ६ डावात फलंदाजी करताना केवळ १ वेळेस बाद झाला आहे. तर ५ वेळेस नाबाद राहिला आहे. यादरम्यान त्याने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटने १९७ धावा केल्या आहेत. एबी डिविलियर्सनंतर जर कुठला फलंदाज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडत असेल तर, तो दिनेश कार्तिक असेल असे म्हणायला वावग ठरणार नाही. याच दमदार कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघात पुनरागमन करेल आणि विश्वचषक देखील खेळेल अशा चर्चांना आता उधाण येऊ लागलं आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिनेश कार्तिकने सामना जिंकून देणारी खेळी केली. या खेळी नंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक यांनी एका मुलाखतीत सहभाग घेतला होता. ज्यात दिनेश कार्तिकने विराट कोहलीला म्हटले की, " मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेतली आहे. मला माहित आहे की, टी-२० विश्वचषक येणार आहे आणि मला भारतीय संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. बरेच वर्ष उलटून गेले भारतीय संघाने आयसीसीच्या स्पर्धेत विजय मिळवला नाहीये. मला संघाचा एक भाग होऊन विजय मिळवून द्यायचा आहे."

त्यानंतर विराट कोहलीने म्हटले की, "मी हक्काने म्हणू शकतो की, दिनेश कार्तिक विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रबळ दावेदारी व्यक्त करतोय. माझ्यासाठी या आयपीएल स्पर्धेत दिनेश कार्तिक हा सर्वोत्तम खेळाडू आहे."

टॅग्स:

IPL

संबंधित लेख