आपल्या पंतप्रधान नमो यांच्या नावावर फोनसारखे प्रॉडक्ट्स विकले गेले आहेतच, पण आता इ-कॉमर्स साईट्सवर एक नवीन प्रॉडक्ट आलंय, नरेंद्रभाईंच्या सारखं दिसणारं एक सॉफ्ट टॉय. टिकल्स नावाच्या खेळणे बनवणाऱ्या एका कंपनीने हे बाजारात आणले आहे.
गंमतीचा भाग असा आहे की सगळ्या इ-कॉमर्स साईट्स या प्रॉडक्टचं वर्णन एकदम भारी केलं आहे. ऍमेझॉन म्हणतंय "तुमच्या लहानग्यांना या वर्षी खुश करा हे सॉफ्ट टॉय देऊन. त्यांच्या बेडरूम मध्ये हे खेळणं असल्यास अनेक तास ते ह्याच्या सोबत घालवू शकतील. जगातल्या सर्वोत्तम मटेरियलने बनलेलं हे एक सुबक असं खेळणं आहे. या सॉफ्टटॉय द्वारा प्राणी जगताशी ओळख करून घ्या. 3-6 वर्षांच्या मुलांसाठी सुयोग्य"!!
स्नॅपडील वर याच प्रॉडक्टचे वर्णन " नरेंद्र दामोदर मोदी ज्यांना आपण नरेंद्र मोदी नावाने ओळखतो ते गुजरात चे मुख्यमंत्री आहेत आणि २०१४च्या निवडणुकीत भाजपाचे पंतप्रधान पदासाठी उमेदवार आहेत. हे प्रॉडक्ट घेऊन मोदींना तुमचा पाठिंबा दर्शवा."
या आधी सुद्धा मोदींच्या चीन दौऱ्यात त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या बाहुल्या चीनमध्ये फेमस झाल्या होत्या. आता हे सॉफ्ट टॉय आलं आहे. मग वाट काय बघताय? घेताय ना विकत?




